राज्यात पुढील ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

मुंबई – राज्यात थंडीतही पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील ४८ तासांत  हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर राज्यात २ दिवस मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर राज्यात  18 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये  वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर राज्यातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –