‘या’ जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

औरंगाबाद : हवामान विभागाने  दिलेल्या सूचनेनुसार औरंगाबाद जिल्ह्यात आज  २७ आणि २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद विभागातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याची सुचना निर्गमित करण्यात आली आहे. ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानुसार २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –