राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. रविवारी ४ ऑक्टोबरला कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्हयात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या सुत्रांनी वर्तविली आहे.

अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती मागील तीन दिवसांपासून कायम आहे. यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात कमी पाऊस पडत आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

शनिवारी (३ ऑक्टो) चिपळूण येथे सर्वाधिक १४७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर गुहागरमध्ये १२० मिलिमीटर पाऊस पडल्याने ओढ्याना पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे भात काढणीची कामे खोळंबल्याची स्थिती आहे.

पुढील दोन ते तीन दिवस या भागात ढगाळ हवामान राहिल आसा अंदाज हवामान खात्याच्या सुत्रांनी वर्तविली आहे. उद्या कोकणातील रत्नागिरी, सिंधूदूर्ग, धुळे, पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्हयात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर इतर भागात काही प्रमाणात उघडीप राहिल.मध्य महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्हयात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल आसा अंदाज हवामान खात्याच्या सुत्रांनी वर्तविली आहे. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून शेतात पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान झाले होते.

 महत्वाच्या बातम्या –