राज्यात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

पुणे – दक्षिण गुजरातची किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक आणि उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे आठवडाभर राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभाग कडून सांगण्यात आले. रविवारपासून (१३ सप्टें.) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.

अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग आणि महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती अरबी समु्द्राचा वायव्य परिसर ते गुजरातची किनारपट्टीपर्यत असून तीन समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर प्रदेशचा आग्नेय भागात कमी दाबाचे पट्टा असून अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती दक्षिण गुजरात पश्चिम राजस्थानपर्यत सक्रिय आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य आणि उत्तर आंध्रप्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्यांचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूंपातर होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.

उत्तर भारतात असलेला मॉन्सूनचा आस बिकानेर, सिकर, शिवपुरी, मांडलापर्यत असून बंगालच्या उपसागराच्या पश्चिमध्य भाग आणि उत्तर आंध्रप्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. जम्मू आणि काश्मिर परिसरात समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ३.६ किलोमीटरच्या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे अधूनमधून ऊन पडत असल्याचे चित्र आहे. रविवारी आणि सोमवारी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. बुधवारी (१६ सप्टें.) मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाचासह पाऊस पडेल. पुणे परिसरातही सोमवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. उद्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –