राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

पुणे – राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी शिडकावा होत आहे. पावसाने उघडीप दिल्याने राज्यात शेतीकामांना वेग आला असून बाजरी, मूग, उडीद पिकांची काढणी सुरू झाली आहे.

कोकणात तीन ते चार दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर या भागातील पाऊस जोर आता कमी झाला आहे. मात्र, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून पावसामुळे हळवी भातपिके धोक्यात आली आहे. पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकरी पीक काढणीचे नियोजन करू लागला आहे. पण शेतात वाफसा नसल्याने पीक काढणीसाठी थांबवे लागत आहे.

निफाड, चांदवड, सुरगाणा तालुक्यातील अनेक भागात पावसाचा जोर दिसून आला. देवळा, त्र्यंबकेश्वर, पेठ,इगतपुरी, कळवण, सिन्नर, येवला, नांदगाव  बागलाण तालुक्यात जोर कमी होता. तर नाशिक, दिंडोरी, मालेगाव तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे.

खानदेशात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ऊन तापू लागले आहे. काही दिवसांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाचा कमी-अधिक प्रमाणात असलेला जोर शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात काही अंशी कमी असल्याचे चित्र आहे. औरंगाबादमधील पाचोड व जालन्यातील सुखापुरी या दोन मंडळात मात्र अतिवृष्टी झाली.

इतर मंडळात तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा होता. वऱ्हाडातही काही अंशी ढगाळ हवामान असले तरी अधूनमधून ऊन पडत असल्याने शेतात वाफसा अवस्था होत आहे. पूर्व विदर्भातही पाऊस नसल्याने भात पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –