राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

पाऊस

मुंबई – ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी शेवटचे २ दिवस आणि सप्टेंबर महिन्याची सुरुवात चांगल्या पावसाने होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आजपासून पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबईत जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज ३१ ऑगस्ट रोजी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, मुंबई, पुणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या –