राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

पुणे –  राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. तर राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरीही लावली आहे. तर राज्यातील अनेक भागांत मॉन्सून दाखल झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर राजूयात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर राज्यात पुढील ४ दिवस म्हणजेच सोमवारपर्यंत संपूर्ण कोकण व पूर्वविदर्भात मुसळधार पाऊस पडणार आहे, तर राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसणार आहे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तर राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकणात पाऊस पडत असल्याने हवेत गारवा वाढल्याने कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सात ते आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर कोकण विभागात तापमानात मोठी घसरण झाली आहे. तर या भागात कमाल तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.

तर राज्यात आज – संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ उद्या – कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ रविवार – कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि सोमवार – कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडणार आहे इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –