राज्यात आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

पुणे – बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे सक्रिय असलेले अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ बुधवारी (दि.२५) रात्री उशिरापर्यंत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या पूर्व किनारपट्टीला धडकले असल्याचं हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. या वादळीप्रणालीमुळे पूर्व किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली असून, जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडत असल्याचं हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. ‘निवार’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही प्रभाव जाणवणार असून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

‘निवार’ चक्रीवादळ बुधवारी (दि.२५) दुपारी कुड्डलोरपासून २४० किलोमीटर, पुद्दुरीपासून २५० किलोमीटर, तर चेन्नईपासून ३०० किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात घोंघावत असल्याचं हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. ही प्रणाली बुधवारी मध्यरात्रीपर्यंत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या कराईकल आणि ममल्लापुरमलगत किनाऱ्याला धडकून कर्नाटककडे सरकत जाण्याचे संकेत आहेत. हे वादळ किनाऱ्याला धडकताना अतितीव्र होऊन ताशी १२० ते १३० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याच्या सूत्रांनी दिला आहे.

आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात पावासाचा मोठा फटका बसणार असल्याचं हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. फळबागा आणि किनाऱ्यालगतच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचं हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. कच्ची घरे, विजेचे खांब, झाडे पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावरही उंच लाटा उसळून, समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले दिला आहे.

ढगाळ हवामानसह पावसाची शक्यता गेल्या काही दिवसांपासून ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. यातच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावलेली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळे निर्माण झाल्याने राज्यात अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, ‘निवार’ वादळीप्रणालीच्या प्रभावामुळे गुरुवार (दि.२६) ते शनिवार (दि.२८) या काळात सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितली आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महत्वाच्या बातम्या –