पुणे – अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र लक्षद्वीपजवळ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे आज (शनिवार) या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर पुढील चार ते पाच दिवस तमिळनाडू, केरळ, गोवा, कोकण किनारपट्टी, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकण किनारपट्टीजवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.
आज (रविवार) चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यानंतर ताशी वेग ११० वरून १४० किलोमीटर, तर सोमवारी (दि.१७ ) अतितीव्र चक्रीवादळामुळे १५० ते १६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच मंगळवारी (ता.१८) सकाळी अतितीव्र स्वरूपातील चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यताहवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
या चक्रीवादळाचा राज्यातही त्याचा काहीसा परिणाम होत असून, पश्चिम महाराष्ट्रात वातावरण ढगाळ झाले असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात कमीअधिक झाले असल्याचं दिसत आहे. या चक्रीवादळामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रादरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाट मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात चांगलेच बदल होतील.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता –
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ , पालघर, भंडारा, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी तीन दिवस वाढला
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ३ हजार रुग्ण कोरोनामुक्त
- शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – सुनील केदार
- चांगली बातमी – देशात ‘या’ तारखेला होणार मॉन्सूनचे आगमन
- अलर्ट! राज्यातील ‘या’ भागात येत्या 12 तासात चक्रीवादळ धडकणार