राज्यातील ‘या’ भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

मुंबई –  हवामान खात्याने दिलेले माहितीनुसार राज्यात आज पावसाची शक्यता आहे. राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते, तर राज्यातील काही भागात चांगलाच पाऊस झाला आहे. तर पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

तर आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , विदर्भ या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार पुढील पुढील 24 तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –