राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

पुणे –  राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसनमध्ये चांगलाच पाऊस झाला. तर सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडला. मात्र आता गुलाब चक्रीवादळाची प्रणाली गुजरातकडे सरकून गेल्याने राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असल्याचे चित्र दिसत आहे.

मात्र हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात येत्या गुरुवारी (ता. ३०) तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे बुधवारी सांगण्यात आले आहे.

अरबी समद्रात तीव्र होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे गुरुवारी उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नंदूरबार, धुळे, नाशिक जिल्ह्याला वादळी पावसासह येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुण्यात आज आणि उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –