नवी दिल्ली – पुढील चार दिवस असाच तुफान पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या चार दिवसात महाराष्ट्र, गोव्यासह 6 राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सूनच्या परतीला विलंब झाल्याचे सांगितलं जात आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता बंगालच्या उपसागरात पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरनंतर पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – सुभाष देसाई
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- ‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!