पुढील तीन दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

पाऊस

मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. राज्यातील नागरिक या संकटाशी दोन हात करत असताना आता राज्यावर आणखी संकट घोंगावत आहे. एकीकडे कोरोना विषाणूशी झगडत असताना अस्मानी संकटाने राज्यावर दुहेरी आघात केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हिरावून गेला आहे. आजही राज्यात पावसाची स्थिती कायम आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिट होत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अशातच, मुंबई हवामान खात्याने कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. आज दुपारपासूनच या जिल्ह्यांमध्ये गडद आभाळ दाटून आले असून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे.

अजूनही या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि महाबळेश्वर या भागात राहाणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुण्यातील भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यासोबतच, पुढील तीन दिवस (7 मेपर्यंत) राज्यात अवकाळी पावसाची स्थिती कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –