चंद्रकांतदादा तुमच्या डोक्यामध्ये नेहमी राजकारण असत अन् माझ्या डोक्यात फक्त शेतकरी – राजू शेट्टी

राजू शेट्टी

कोल्हापूर – सध्या राज्यात दुधाला २२ रुपये इतरा दर मिळत आहे. पण, या रकमेतून मूलभूत खर्चाची जुळवाजुळव करत असतानाही शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. लॉकडाऊन होण्याआधी दुधाला प्रतिलीटर साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. पण याबाबत आता मात्र निषेध होताना दिसत नाही. एकेकाळी दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेऊ म्हणाऱ्या राजू शेट्टी यांच्याकडून आता मात्र कोणतीही भूमिका मांडली जात नाही. शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर केली होती.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; तूर खरेदी केंद्र कधी उघडतील याची शाश्वती नाही

या टीकेला आता राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. ‘चंद्रकांत दादा तुमच्या डोक्यामध्ये नेहमी राजकारण असत राजकीय हेतूनेच कधी काळी तुम्ही मला विष्णूचा अवतार म्हंटल होत. माझ्या डोक्यात मात्र फक्त शेतकरी आणि शेतकरीच असतो. अस ट्विट करत राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान साधलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने संपवलं जीवन; आत्महत्येनंतर होतेय ‘या’ नावाची चर्चा

तर दुरीकडे ‘केंद्र सरकारने दहा हजार टन आयातीचा निर्णय घेता क्षणी मी १० जुलै रोजीच ट्वीट करून पंतप्रधानाच्या लक्षात आणून दिल होत. २१ जुलैला मी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतोय तुम्हाला खरोखर शेतकर्यांचा कळवळा असेल तर या आंदोलनात सामील व्हा’. अस देखील राजू म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

पुढील वर्षासाठी साखरेच्या निर्यातीसाठी नवे धोरण जाहीर करावे ; केंद्र सरकारकडे मागणी

शेतकऱ्याच्या “कबिरे” ला भावपूर्ण निरोप, घरासमोर उभारली समाधी