त्या शेतकऱ्यांना पुन्हा भरता येणार कर्जमाफीचा अर्ज-चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा: “शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत चुकीच्या माणसाला पैसे जाऊ नयेत, म्हणून सर्व पडताळणी करून शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. पण जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेतून काही कारणास्तव बाजूला काढले असतील, किंवा सिस्टीममधून बाहेर पडले असतील, त्यांच्यासाठी आमची एक समिती असेल. ही समिती त्या सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेईल, आणि जर त्यांची नावं कर्जमाफीच्या प्रक्रियेतून चुकीने काढले गेले असतील, तर त्यांना पुन्हा एकदा यादी करून लाभ दिला जाईल.” तर ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा अर्ज भरायचा राहिला असेल, त्यांना सुद्धा पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मुदत देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.ते औरंगाबाद मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफी वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेचे आमदार तर राष्ट्रवादीच्या एका माजी खासदाराच्या खात्यावर अर्ज न भरताच कर्जमाफीची रक्कम जमा झाली होती त्यामुळे सरकार मोठी टीका सुद्धा झाली होती.