स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारकांच्या समस्या सोडविणार – छगन भुजबळ

छगन भुजबळ

संपूर्ण राज्यातील परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ, हॉकर्स, केरोसीन परवाना धारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

रेशन कार्डधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन उपलब्ध होणार- जयकुमार रावल

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते.

ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मे. टन धान्याची बचत

श्री. भुजबळ म्हणाले, अन्न अधिकार अभियानाच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजनेबाबतच्या ज्या काही विविध मागण्या आलेल्या आहेत, त्या सोडविण्याबाबत शासन प्रयत्न करेल. यामध्ये रास्त भाव धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारकांच्या गाव, शहर, तालुका, जिल्हास्तर आदी ठिकाणच्या विविध समस्या आहेत. उज्ज्वला गॅस योजना व कमी करण्यात आलेल्या रॉकेल पुरवठ्यासंदर्भात तसेच रेशन दुकानातील पॉस मशीन संदर्भात असणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी शासन योग्य तो निर्णय घेईल. यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव महेश पाठक, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅस कनेक्शन मिळणार – देवेंद्र फडणवीस

ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मे. टन धान्याची बचत