राज्यात १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार – छगन भुजबळ

छगन भुजबळ

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता फक्त राज्याच्या नव्हे तर देशाच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यात ५८ हजार ९२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे.

दरम्यान,संचारबंदी लावूनही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने सरकार चिंतेत असून या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लॉकडाऊन कडक करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर या बैठकीत आपण १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. साखळी तोडणं आणि सुविधा वाढवून लोकांना वाचवणं या दोन मार्गांनी काम केलं पाहिजे. लोक कारणं काढून फिरतातच आहेत. आठ ते दहा दिवसांनी लोकांना काही अडचण होणार नाही. सहा ते आठ महिन्यांचा लॉकडाउन नको. पण १५ दिवसांसाठी केलं तर बरं होईल. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असून आज पुन्हा एकदा त्यांच्यासमोर मुद्दा मांडणार आहे असं ते म्हणाले.

दरम्यान, संचारबंदीनंतरही राज्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत नाहीये. त्यामुळे अनेक मंत्र्यांनी राज्यात कडक लॉकडाऊनची मागणी केली आहे. यावर या बैठकीत चर्चा होऊन आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या –