कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी येत्या महिन्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, म्हणून राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येणार आहे. मात्र वास्तवात या योजनेपासून अनेक कर्जबाजारी शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी येत्या महिन्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी यावर्षी ५८,२४४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे टार्गेट आहे. त्यामुळे बँकांनी कसलेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएलबीसीच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पीक कर्जाची आवश्यकता असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कर्ज नक्की मिळणार आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Loading...

तसेच राज्यातले जेवढे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने पासून वंचित आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस येत्या महिनाभरात मोठी घोषणा करणार आहेत. असे मुनगंटीवार म्हणाले.

जलसंवर्धन, सिंचन क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी इस्त्रायलचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल – देवेंद्र फडणवीस

महायोजना शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना निश्चितच होणार फायदा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Add Comment

Click here to post a comment
Loading…