‘वाढदिवस’ साजरा न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

मुख्यमंत्री फडणवीस

दि. २२ जुलै रोजी असलेला आपला वाढदिवस  लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही बडेजावपणा करून साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग, बॅनर्स, जाहिराती दिसणार नाहीत, हे प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुनिश्चित करावे. जल्लोषाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत.  वाढदिवसानिमित्त ज्या कुणाला खर्च करण्याची इच्छा असेल, त्यांनी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान म्हणून द्यावा, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

दारु पिऊन गाडी चालवल्यावर इंजिनचं सुरु होणार नाही; गडकरींचं भन्नाट तंत्रज्ञान

मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे करणार विठ्ठल-रखुमाईची महापुजा- सूत्र

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.