ते म्हणाले की, मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की, पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला.
आजही आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे, असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे.
यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान…’ असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले ‘हे’ मोठे आवाहन
- जगात;देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट चिंताजनक – छगन भुजबळ
- ‘या’ जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय ४ जानेवारीपर्यंत संस्थगित
- पुढील 3 वर्षात शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करणार