‘या’ जिल्ह्यांमधील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यासह देशातील दुसरी लाट आता ओसरू लागली आहे.  राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने अधिक सूट दिली आहे. राज्य कोरोनाशी लढाई करत असतानाच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीमुळे गंभीर पूर्वस्थितीला सामोरे जावे लागले. आता राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूट दिली जात असली तरी पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती ही अद्याप अधिक आहे.

राज्यातील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांमधील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘पूर येण्याआधी देखील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी ही अधिक होती. आता पुरानंतर इतर रोगराईसह कोरोनाचा धोका देखील वाढला आहे. यासह सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये देखील अजून कोरोना रुग्ण हे शेकड्यावर सापडत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुणे जिल्ह्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहर वगळता निर्बंध कायम; तर दोन्ही शहरांना ‘या’ सूट !

सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार, यासाठी ५० टक्के आसन क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे. शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मॉल देखील सुरु करण्यात येणार असून मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –