”वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना तुरुंगात टाका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश!

औरंगाबाद

औरंगाबाद –      काल मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा झाली. या सभेला शिवसेनेने स्वाभिमान सभा असे नाव दिलेले होते .  दरम्यान उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर अधिक आक्रमक होत भूमिका मांडली.

मुख्यमंत्री(CM)म्हणाले, “मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. इथे पाणी प्रश्न बिकट असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता शहरासाठी निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे.”मुख्यमंत्री(CM) उद्धव ठाकरे पाणी प्रश्नावर अधिक आक्रमक झाले होते.

नामांतरावर मुख्यमंत्री(CM) म्हणले कि मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –