राज्यातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी व्हॅनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

आरोग्य तपासणी व्हॅन

बांधकाम कामगार,सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनी मधील कामगार व इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटित कामगार याकरिता वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे याकरिता एका डिजिटल चेकअप बसचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. ओम गगनगिरी हॉस्पिटल व ऑक्युपेशनल हेल्थ सर्विसेस सर्विसेस  कोपरखैरणे यांची भारतातील ही तिसरी डिजिटल हेल्थ चेकअप बस आहे.

सदर डिजिटल बस महाराष्ट्रातील असंघटित कामगार माथाडी कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार तसेच एसटी महामंडळातील  कामगार यांच्या आरोग्य तपासणीसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’ची चिंता करावी – देवेंद्र फडणवीस

सदर बसमध्ये अद्ययावत अशा डिजिटल एक्स-रे, डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी, बहिरेपणाची तपासणी फुफुसाची तपासणी व रक्ताच्या विविध तपासण्या करणारी उपकरणे असून कामगार काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी करणार आहे. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब आमदार तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील समनव्यक रवींद्र वायकर, डॉ. प्रकाश शेंडगे, ज्ञानराज चोंघुले आदी उपस्थित होते.

 महत्वाच्या बातम्या –

निरोगी राहण्यासाठी प्लास्टिकऐवजी वापरा ‘या’ इको फ्रेंडली बॉटल्स

गावांचे पाणी नमुने तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत धोरण तयार करावे -आरोग्यमंत्री

पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – एकनाथ शिंदे