मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

उद्धव ठाकरे

कोल्हापूर – २१ जुलै पासून सलग तीन दिवस कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ह्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे २०१९ पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.

२०१९ सालच्या महापुरांनातर सलग दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यातच पुन्हा पूर यामुळे व्यापाऱ्यांसह अनेक कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात घरादार उध्वस्त झाल्यामुळे पुन्हा उभं राहण्यासाठी या कुटुंबांना आणि व्यावसायिकांना मदतीच्या हाताची गरज आहे. पूर ओसरल्यापासून अनेक नेत्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा कोल्हापूर दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर आज(दि. ३० जुलै) रोजी ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री ठाकरे यांचे सकाळी १०.०० वाजता आगमन होईल. यानंतर ते मोटारीने शिरोळ-नृसिंहवाडी रोड येथील भागाची पाहणी करतील. त्यानंतर ते ११वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी गल्ली ६ वी गल्ली आणि भागातील पाहणी करतील.

दुपारी १.१५ वाजता गंगावेश ते शिवाजी पुल येथील भागाची पाहणी, २.०० वाजत शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतील. तर ३.०० वाजता ते मुंबईसाठी प्रयाण करतील.

महत्वाच्या बातम्या –