मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिक येथील शिवभोजन केंद्रास भेट; लाभार्थ्यांशी साधला संवाद

शिवभोजन केंद्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडाळा नाका परिसरातील द्वारकामाई बचत गटातर्फे चालविण्यात येत असलेल्या शिवभोजन केंद्रास भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार पंकज पवार, माजी खासदार समीर भुजबळ, बचतगट अध्यक्षा अलका चहाळे, मंगला चहाळे उपस्थित होते.

Loading...

श्री. ठाकरे यांनी यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधला. शिवभोजन थाळीबाबत समाधानी आहात का, असे त्यांनी विचारल्यावर लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारणा केल्यामुळे डोळ्यात पाणी आल्याचे तुकाराम नाडे यांनी सांगितले. अन्य लाभार्थ्यांनीदेखील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या –

सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब, माढ्याला नव्याने एमआयडीसी – आदिती तटकरे

आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात

नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन

Loading...