मुंबई – मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौऱ्यावर आहेत. परळी येथे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेसह जयंत पाटलांनी पूरस्थितीची शेतातील नुकसानीची पाहणी केली आहे. दरम्यान आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नुकसानीच्या पाहणीसाठी करण्यासाठी मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या परिस्थीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच या भागाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं तसं कळवलं आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. यंदाच्या पावसाळ्यात राज्यभरात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीच्या माहितीसाठी वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.
दरम्यान यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती देखील यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार पाऊस कोसळणार
- अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली ७८०० कोटींची मागणी
- आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली ‘ही’ विनंती
- सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस