चीनचा भन्नाट शोध…..तीन कृत्रिम चंद्रांची निर्मिती

चीनचा भन्नाट शोध…..तीन कृत्रिम चंद्रांची निर्मिती chndra

स्ट्रीट लाईट ही संकल्पना कायमची हद्दपार करण्यासाठी चीनने एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. यासाठी आता चीन तीन कृत्रिम चंद्र बनविण्याच्या तयारीत आहे. २०२० पर्यंत चीन तीन कृत्रिम चंद्र लॉन्च करणार आहे.

कसा असेल कृत्रिम चंद्र 
कृत्रिम चंद्र हा एक प्रकारचा आरशांचा सॅटेलाईट असणार आहे. हे आरसे सूर्याची किरणे पृथ्वीवर परावर्तित करतील. हे तीनही चंद्र २०२० पर्यंत चीनमधील सिचुआन प्रांतातील चेंगडू येथे जमिनीपासून ८० किमी उंचीवर असणार आहेत. या कृत्रिम चंद्राचे जमिनीपासून यानंतर कमी असल्याने नेहमीच्या चंद्रापेक्षा ८ पट जास्त प्रकाश देण्याचा अंदाज आहे. या कृत्रिम चंद्रांमुळे ८० किमीच्या परिसर प्रकाशमान होईल. यामुळे स्ट्रीट लाईटची गरज भासणार नाही.

दरम्यान, कृत्रिम चंद्राचा प्रयोग करणारा चीन हा पहिला देश नसून याआधीही अमेरिका आणि रशियाने असे प्रयोग केला आहेत. परंतु, हे प्रयोग यशस्वी होऊ शकले नाही.