Cholesterol | चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश

Cholesterol | चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

टीम महाराष्ट्र देशा: आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी शरीराला ॲक्टिव ठेवणे खूप महत्त्वाचे असते. नियमित व्यायाम (Exercise) केल्याने शरीर ॲक्टिव राहते आणि त्याचबरोबर वजनही नियंत्रणात राहते. परिणामी आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. त्याचबरोबर नियमित व्यायाम केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol) ची पातळी चांगली राहते. पण अनेक आरोग्य तज्ञांच्या मते शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल  ठेवण्यासाठी व्यायामासोबत खाण्याच्या सवयींकडे देखील लक्ष दिले गेले पाहिजे. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शरीरामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

सबजा (Chia Seeds)

नियमित सबज्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि त्याचबरोबर शरीरामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल देखील राहते. सबजामध्ये मुबलक प्रमाणात फायबर उपलब्ध असते. त्यामुळे ते वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर सबजामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे नियमित याचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

अक्रोड (Walnuts)

हिवाळ्यामध्ये शरीराला उब मिळण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक अक्रोडाचे सेवन करत असतात. अक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅट्स उपलब्ध असतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये अक्रोडाचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवता येऊ शकते.

खोबरेल तेल (Coconut Oil)

आरोग्य तज्ञांच्या मध्ये शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे नियमित खोबरेल तेलाचे सेवन केल्याने शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवू शकते. त्याचबरोबर खोबरेल तेलाच्या सेवनाने आरोग्यालाही अनेक फायदे मिळू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या