चक्क कृषिमंत्र्यांनी धरले शेतकरी जोडप्याचे पाय; शेतकरी कुटुंबही भारावले

कृषिमंत्र्यांनी धरले शेतकरी जोडप्याचे पाय

कृषीमंत्री  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे साप्ते कोणे येथे माजी मुख्यमंत्री कै. वसंराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषिदिन आणि ‘कृषी संजीवनी सप्ताह ’ 2020 च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भेटून नवीन योजना, बियाणे, तंत्रज्ञान, यांची माहिती  देत आहेत. त्यांनी शेतकरी बांधवाना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच राज्य सरकारने 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी विभागाने सदैव तत्पर राहावे – अशोक चव्हाणतसेच आपला शेतकरी बांधव हा आजच्या काळात आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याला अद्ययावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. हे अद्ययावत कृषी तंत्रज्ञान ‘कृषी संजीवनी सप्ताह’च्या माध्यमातून मिळण्यास मदत होईल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

मजुरांच्या बँक खात्यात सरकार टाकणार दोन हजार रुपये; अशी करा नोंदणी

त्याचप्रमाणे कृषिमंत्र्यांनी  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या सप्ताहाची सुरुवात करणार, असे आधीच जाहीर केले होते. तेथे त्यांनी चक्क शेतकरी जोडप्याचे पाय धरल्याने उपस्थितांनाही आश्चर्य वाटले, तर शेतकरी कुटुंबही भारावून गेले.

कृषी तंत्रज्ञान पोहोचणार शेतकऱ्यांच्या बांधावर – यशोमती ठाकूर

त्यावेळी त्यांनी दरम्यान होणाऱ्या सप्ताहात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  लोकप्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यातून दर्जेदार बियाणे, खतांचा सुयोग्य वापर, आधुनिक औजारांचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गावात कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक येतात का? – कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली विचारणा

त्यानंतर त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. किशोर पवार या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन  कृषी विभागाच्या मदतीने उभारलेल्या शेडनेडची पाहणी त्यांनी केली.  तसेच हिरामण ठाकरे या शेतकऱ्याने मनरेगा अंतर्गत उभारलेल्या शेततळे व फळबाग याचीदेखील पाहणी त्यांनी केली. त्यांनतर एकनाथ भोये यांच्या शेतात यांत्रिकी पद्धतीने भात रोपांची लागवड देखील त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –

चुकीच्या बातमीचा टॉमेटोला फटका; कोट्यावधींचे नुकसान, उत्पादक चिंतेत..!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काजू बागायतदारांना फटका