नागरिकांनो काळजी घ्या ; बदलत्या तापमानामुळे वाढला धोका !

धोका

पुणे – कोरोना आजरांनंतर सध्या मानवी जीवनशैली पूर्वपदावर आलेली आहे. सध्या राज्यात सतत तापमान बदल(Temperature changes) होत असल्याचे आपल्याला जाणवत असेल वारंवार बदलत असलेले तापमान(Temperature) हे शरीरासाठी एवढे घातक असून मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांना मोठा धोका आहे हवामानातील बदलामुळे घातक कॉलराचा प्रादुर्भाव वाढू शकतो तापमानाची तीव्रता जास्त असल्यास हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, श्वसन रोग, सेरेब्रोव्हस्कुलर रोग आणि मधुमेह-संबंधित परिस्थिती यांसारख्या जुनाट स्थिती देखील बिघडू शकते.. .

सध्या तापमानात.(Temperature) घट झालेली असून उष्णेतून दिलासा मिळाला असला तरी, सतत चढ उतार होणारे तापमान त्यामुळे मानवी शरीराचे नुकसान होत आहे असे नोएडा इंटरनॅशनल इन्स्टिटयूड ऑफ मेडिकल सायन्सचे सहाय्य्क प्रोफेसर डॉक्टर सुमोल रत्ना म्हणाले. तसेच ‘माघील काही आठवड्यापासून होत असलेल्या तापमानातील मोठे बदल हे खूप धोकादायक आहेत. लोकांची शारीरिक क्षमता हि सर्वांची वेगवेगळी असते त्यात शरीर बाहेरील वातावरणाशी जुळून घेण्याची क्षमता हि सगळ्या नागरिकांत वेग वेगळी असल्याचे दिसून येते. वृद्ध नागरिक हे बाहेरील तापमानाशी(Temperature) समानता राखण्यास कमकुवत असतात.

दिल्ली येथील सीके बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. राजीव गुप्ता म्हणाले कि ”हायपरथायरॉईडीझम चा त्रास असलेल्या नागरिकांना अति उष्णतेने अस्वस्त वाटते अश्या लोकांना उन्हाळ्यात खूप घाम येणे, गरम वाटणे धडधडणे अशी लक्षणे दिसून येतात. वारंवार बदलणारे तापमान उष्णेतेच्या लाटेपेक्षा धोकादायक असून मुधमुरेह आहे रक्तदाबाच्या रुग्णांना सर्वाधिक धोका असल्याचे दिसून आले आहे.

महत्वाच्या बातम्या –