हवामान बदलाचा शेतीला फटका, कृषी संशोधन परिषदेचा अहवाल

जागतिक अस्थिर हवामानाचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने पडणार असल्याचा या संदर्भातील अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालय आणि कृषी संशोधन परिषदेने सादर केला आहे. त्यामध्ये हवामान बदलामुळे कृषी उत्पादनावर होणाऱ्या 2020 पर्यंतच्या देशांतर्गत कृषी उत्पादनात सरासरी 15 टक्के घट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्यामुळे हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील देखील जिल्ह्यांना बसणार आहे. त्यामध्ये आधीच अल्प शेती उत्पन्न मिळणाऱ्या जिल्ह्यांचे स्थान अग्रस्थानी आहे. या अहवालानुसार, राज्यातील एकंदर 17 जिल्हे हवामान बदलाच्या दृष्टीनं असुरक्षित गणले गेले असून त्यात सोलापूर, अहमदनगर, बीड आणि उस्मानाबादसह लातूर, बुलढाणा, सांगली, नाशिक, धुळे, जालना आणि अमरावती आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.