पूर्वसूचना न देता मका खरेदी प्रक्रिया बंद

मका

गंगापूर – शेतकऱ्यांनी गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादित केलेला मका खरेदी करण्यासाठी शासनाने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ५ जून पासून खरेदी प्रक्रियेला सुरवात केली होती. त्यापूर्वी प्रत्येक तालुका स्तरावर खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातुन यासाठी नियोजन करण्यात आले होते. मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येऊन त्यांना टोकन देण्यात आले होते. मात्र शासनाचे मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी प्रक्रिया पणन महामंडळाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आली. याचा फटका गंगापुर तालुक्यासह राज्यभरातील मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

तालुक्यातील १ हजार ८२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यापैकी ४५० शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात आली तर ६३२ शेतकऱ्यांची मका शिल्लक आहे परंतु खरेदी प्रक्रिया शासनाकडूनच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी मका भरुन सुमारे दोनशे वाहने आणून ऊभी केली होती.

आरोग्यदायी लवंग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये तिव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला धडक देत आमची मका खरेदी करा नाहीतर आम्ही मक्याची वाहने तहसील कार्यालयात आणून त्यावर बसून स्वतःला पेटवून घेऊ असा इशारा दिला आहे. आता यावर शासन मका खरेदी करणार कि नाही या कडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या –

आज ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषिमंत्री