टीम महाराष्ट्र देशा: देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता लोक पेट्रोल डिझेल टाळण्यासाठी इतर पर्याय शोधत आहे. त्यामध्ये CNG कारचा पर्याय लोकांना एक सर्वोत्तम मार्ग वाटत आहे. कारण CNG वाहने लोकांना अनेक फायदे देत आहे. त्यामध्ये किमती पासून मायलेज पर्यंत सर्वच गोष्टींचा फायदा होतो. कारण पेट्रोल डिझेल कार पेक्षा CNG कार ची किंमत कमी असते. त्याचबरोबर CNG गाड्या चांगले मायलेज देऊन पर्यावरणाची फारशी आणि करत नाही. अशाच काही CNG कारबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
बेस्ट CNG कार
Maruti Suzuki Dzire CNG
मारुतीने आपली Maruti Suzuki Dzire CNG ही कॉम्पॅक्ट सेडान कार CNG व्हर्जन मध्ये लाँच केली आहे. या कारमध्ये 1.2L, 4-सिलेंडर आणि ड्युअलजेट पेट्रोल इंजिन यांचा समावेश आहे. हे इंजिन 77.49 PS पॉवरसह 98.5 Nm टार्क जनरेट करते. मारुतीची हि CNG कार 31.12km/kg पेक्षा जास्त मायलेज देते. या कारची एक्स शोरुम किंमत 8.23 लाख ते 8.91 लाख रुपये एवढी आहे.
Hyundai Grand i10 Nios CNG
ह्युंडाईच्या या कार मध्ये CNG किटसह 1.2L, 4-सिलेंडर इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 68Bhp पॉवर आणि 95Nm टार्क निर्माण करते. या CNG कारची एक्स-शोरुम किंमत 7.16 लाख ते 8.45 लाख रुपये एवढी आहे.
Tata Tiago iCNG
टाटाच्या Tata Tiago iCNG या कारमध्ये 1.2L 3-सिलेंडर रेव्होट्रॉन इंजिन आहे. हे इंजिन मॅक्झिमम 73PS पॉवर आणि 95Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. 26.49 km/kg पर्यंत ही कार मायलेज देते. या कारची एक्स-शोरुम किंमत 6.30 लाख ते 7.82 लाख रुपये एवढी आहे.
Maruti Swift CNG
नुकतीच लाँच झालेली मारुतीची Maruti Swift CNG कार 1.2L, 4-सिलेंडर ड्युअलजेट इंजिन सुसज्ज आहे. हे इंजिन 77.49 PS मॅक्झिमम पावर आणि 98.5Nm टार्क निर्माण करते. ही CNG कार 30 km/kg पेक्षा जास्त मायलेज देते. या कारची एक्स-शोरुम किंमत 7.77 लाख रुपये एवढी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Shelar vs Pawar | शरद पवारांविरुद्ध आशिष शेलार मैदानात! कोण मारणार बाजी?
- Uddhav thackeray | निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरेंची हायकोर्टात धाव
- Uddhav Thackeray | “उलट्या काळजांच्या लोकांनी कट्यार काळजात घुसवली”; उद्धव ठाकरे भावूक
- Urvashi Rautela | “अरे दीदी त्याचा पाठलाग सोडा” ; नेटकऱ्यांनी केले उर्वशी रौतेलाला ट्रोल
- Job Alert | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू