‘सीएनजी’ चा अनेक जिल्ह्यात तुटवडा ; नागरिकांमध्ये गाडी विकण्याची वेळ.

सीएनजी

औरंगाबाद – राज्यात सध्या इंधन दर वाढीने वाहनचालक तसेच सर्व नागरिक वैतागलेले आहे खिश्याला कात्री लागत असून इंधनाला दुसरा पर्याय म्हणून बहुतांश नागरिक हे CNG कडे वळाले. परंतु आत CNG पुरवठ्यावर अनेक अडचणी समोर येत असून औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील अनेक पंपावर तुडवडा जाणवत असल्याचे चित्र बघायला मिळते.

काही ठिकाणी दोन ते तीन दिवस पंपावर सीएनजी(CNG) उपलब्ध नसल्याने गाडी मालक त्या ठिकाणी मुक्काम करत आहेत. याचा सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसत असून रिक्षा चालकांना रिक्षा जागेवर ठेवण्याची वेळ आली आहे. औरंगाबादच नव्हे तर अनेक जिल्ह्यात ह्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल – डिझेल चे वाढणारे दर त्यामुळे नागरिकांचा कल हा CNG कडे वळला त्यामुळे मोठ्याप्रमाणात बाजारात CNG गाड्या आल्या व त्यांची विक्री वाढली. आता शहरात सीएनजी(CNG) गाड्या मोठ्या प्रमाणात झाल्याअसून सीएनजी(CNG) पंप राज्यात व मराठवाड्यात अपुरे पडत आहे त्यामुळे नागरिक सीएनजी(CNG) पंप वाढवावे अशी मागणी करत आहे.

रिक्षा चालकांचे घर, परिवार हा रिक्षावर चालत असतो . त्यात वाढते पेट्रोल चे दर ह्यामुळे ४ पैसे जास्त मिळावे म्हणून रिक्षा चालकांनी गाडीमध्ये सीएनजी(CNG) बसवले परंतु त्यांना वेळेवर सीएनजी(CNG) भेटत नसल्याने अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आहे.

महत्वाच्या बातम्या –