मोगऱ्याची शेती; एकदा लागवड केल्यानंतर सलग १० वर्ष घ्या उत्पन्न

मोगरा ही सुवासिक फुलांची एक वनस्पती आहे. ही प्रजाती ओलिएसी कुलातील आहे.या प्रजातीत जाई (चमेली),जूई,मोगरा इत्यादी सुमारे २०० विविध सुवासिक फुलांचा समावेश होतो. ही बहुवर्षीय व सदाहरित वनस्पती असून यांपैकी काही वेलीसारख्या पसरणाऱ्या, काही झुडपांसारख्या वाढणाऱ्या,काही उष्ण व दमट हवामानात, तर काही  समशीतोष्ण कटिबंधात चांगल्या प्रकारे वाढतात. भारतात मुख्यत्वे करून या प्रकारच्या फुलांचा उपयोग वेण्या, गजरा व हार यांसाठी केला जातो.  तसेच परदेशात विशेषतः फ्रान्समध्ये त्यांचा उपयोग सुगंधी द्रव्ये मिळविण्यासाठी होतो.

मोग-याची शेती हा फुलशेतीत शेतक-यांना चांगला पर्याय ठरू शकतो. मोग-याची शेती ही बाग एक वेळ केली की सलग १० वष्रे उत्पादन घेता येते. या शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. जनावरांकडून मोग-याला धास्ती नसते. यात शाश्वत उत्पन्न मिळत असून बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे हमीभावही चांगला मिळतो. ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास शेतक-यांसाठी अधिक किफायतशीर ठरते. विशेष म्हणजे एकदा लागवड केलेली बाग सलग १० वष्रे फुले देत असल्याने ठिबक सिंचनाचा खर्च पहिल्याच वर्षी वसूल होतो. तसेच रोपे लागवडीसाठी जमीन मशागत व रोपांचा खर्चही पहिल्याच वर्षी करावा लागतो.

मोगरासाठी लागणारी जमीन – तसे पाहिले तर मोगरा सर्व प्रकारच्या जमिनीत चांगला येतो. तरी पण मध्यम खोलीची आणि भुरकट जमीन असली तर उत्तम. जमिनीत चुनखडी नसावे जमीन चांगला निचरा होणारी असावी. जर मुरमाड आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन जर असली तर मोगरा पीक उत्तम येते.

मोगरा लागवडीचा काळ – मोगऱ्याची लागवड जूनचा पहिला पाऊस पडून गेल्यानंतर करावी. मोगऱ्याची लागवड शक्यतो पिशवीतील रोपे लावून करावी. त्यामुळे दीड ते दोन महिने रोपे नर्सरीत वाढतात व मर टळली जाते.

पहिल्या वर्षी खते व कीटकनाशके ४५ हजार रुपये, रोपे ३५ हजार रुपये, बेड खर्च १० हजार रुपये, ठिबक सिंचन खर्च ३५ हजार रुपये, वाहतूक खर्च ५ हजार रुपये, तर कामगार मजुरी २ लाख ४० हजार रुपये अशाप्रकारे एकूण ३ लाख ७० हजार रुपये खर्च येतो. मात्र या बदल्यात ९ लाख रुपये हमखास मिळत असल्याने ४ लाख ३० हजार रुपये आर्थिक फायदा होतो. पहिल्या वर्षातील एकूण खर्चामधील किमान १ लाख रुपये खर्च दुस-या वर्षापासून करावा लागत नसल्याने ५ लाख १० हजार रुपये तिस-या वर्षापासून निव्वळ नफा मिळू शकतो. एकदा केलेली बाग सलग दहा वर्षे राहत असल्याने या दहा वर्षामध्ये २७ लाख रुपये खर्च येतो. मात्र यातून ९० लाख रुपयाचे आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे तब्बल ६३ लाख रुपयांचा आर्थिक फायदा होऊ शकतो.

मोगऱ्याच्या जाती :

  • मोतीचा बेला : कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या गोलाकार असतात.
  • बेला : या मोगऱ्याच्या जातीला तामिळ भोषेत ‘गुडूमल्ली’ म्हणतात. फुलाला दुहेरी पाकळ्या असतात पण लांब नसतात.
  • हजरा बेला : कानडी भाषेत ‘सुजीमल्लीरो’ म्हणतात. फुलात एकेरी पाकळ्या असतात.
  • मुंग्ना : तामिळ भाषेत ‘अड्डुकुमल्ली’ व कानडीत ‘एलुसूत्ते मल्लरी’ म्हणतात. कळ्या आकाराने मोठ्या असतात. फुलात अनेक गोलाकार पाकळ्या असतात.
  • शेतकरी मोगरा : ह्या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या कळ्या येत असून हार व गजरे याकरीता वापरला जातो.
  • बट मोगरा : ह्या मोगऱ्याच्या कळ्या आखुड असून कळ्या चांगल्या टणक फुगतात.

महत्वाच्या बातम्या –