मुंबईसह राज्यभरातून थंडी गायब, मुंबईचे कमाल तापमान थेट ३५ अंश

मुंबईसह राज्यभरातून थंडी गायब, मुंबईचे कमाल तापमान थेट ३५ अंश temperature

मुंबईसह राज्यभरातून थंडी गायब होणार असल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने रविवारी म्हणजेच ९ फेब्रुवारी १०१० रोजी केली होती. त्यांनुसार मंगळवारी म्हणजेच ११ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईचे कमाल तापमान थेट ३५ अंश नोंदविण्यात आले आहे. मंगळवारी म्हणजेच ११ फेब्रुवारी २०२० सकाळी अकराच्या सुमारास काही काळ ऊन होता त्यानंतर दुपारच्या सुमारास काही काळ ढगाळ वातावरण होते. तर त्यानंतर पुन्हा अडीचच्या सुमारास  रखरखीत ऊन आले अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव मंगळवारीम्हणजेच ११ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईकरांनी घेतला आहे. हवेतला गारवाही हळूहळू कमी होत असल्याने तापमानाचा वाढता पारा मुंबईकरांना तापदायक ठरणार आहे.

नागपुरात हिवाळा कायम ; परतीच्या पावसाने धास्तावले शेतकरी

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोकण, गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईचा विचार करता, मुंबईकरांची मंगळवारची दुपार ‘ताप’दायक ठरली. कमाल तापमान ३५ अंश आणि वातावरणात उठलेल्या धुळीने येथील वातावरण काहीसे धूळसदृश्य झाले होते.