मुंबईसह राज्यभरात गारठा कायम

राज्यात काल म्हणजेच जानवेरीच्या सेटच्या दिवशी ३१ जानेवारी २०२० या दिवशी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले, तर मुंबईचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथील वेधशाळेत १३.८ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असून, नव्या वर्षातले हे आतापर्यंतचे सर्वात कमी किमान तापमान आहे.

मुंबईसह कोकण विभागात सर्वच ठिकाणी तापमान घसरले

३० जानेवारी २०२० रोजी मुंबईचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस होते तर काल म्हणजेच ३१ जानेवारी २०२० रोजी किमान तापमानाने हाच कित्ता गिरविला. तर महाबळेश्वरचे किमान तापमानही  १३.३ अंश नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मुंबई शहरासह उपनगरातही किमान तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे.

पुण्याचा पारा पाेहचला 10 अंशावर

पुढील २४ तासांसाठी राज्यासह मुंबईचे किमान तापमान स्थिर राहील. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज १ आणि उद्या २ फेब्रुवारी रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. तर १ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस  पडणायची शक्यता आहे. ४ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.