राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता

पुणे – गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा व विदर्भात किमान तापमानाचा पारा घसरत आहे. त्यामुळे किमान तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेले दिसत आहे. पुढील काही दिवस राज्यातील सर्वच थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान सूत्रांनी सांगितले आहे. उर्वरित अनेक भागांतील किमान तापमान आणखी खाली येण्याचा अंदाज हवामान सूत्रांनी सांगितले आहे. मराठवाडा व विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही थंडी वाढत असून, किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत आला आहे. राज्यातील यवतमाळ, निफाड, चंद्रपूर येथेही किमान तापमान आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. त्यामुळे थंडीने चांगलीच हुडहुडी भरवली असून, दिवाळीच्या आगमनालाच शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

राज्यातील सर्वच भागांत थंडी वाढल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत नऊ सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. विदर्भात ८ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाची नोंद झालेली आहे. तर मराठवाड्यात ८ ते १४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.

निफाड, पुणे, नाशिक, नगर, जळगाव भागांत तापमान १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून, साधारणपणे या भागात १० ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. कोकणातही थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली असल्यासीताफळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्याचे हवामान सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअस) मुंबई (सांताक्रूझ) १९.२ (-३), अलिबाग १८.९ (-३), ठाणे २२.२, रत्नागिरी २१.० (-२), डहाणू १९.८ (-२), पुणे ११.३ (-४), जळगाव १२ (-४), कोल्हापूर १६ (-३), महाबळेश्वर १३.६ (-१), मालेगाव १३.८ (-१), नाशिक ११.८ (-३), निफाड १०, सांगली १४.५ (-४), सातारा १२.८ (-४), सोलापूर १३ (-६), औरंगाबाद १२.५ (-३), बीड १५.४ (-१), परभणी १०.१ (-७), परभणी कृषी विद्यापीठ ८.५, नांदेड १३.५ (-३), उस्मानाबाद १४ (-३) अकोला १२.७ (-५), अमरावती १२.५ (-५), बुलडाणा १३.८ (-४), चंद्रपूर ८.६ (-९), गोंदिया १०.५ (-७), नागपूर ११.५ (-५), वर्धा १२.४ (-५), यवतमाळ ९.५ (-८).

महत्वाच्या बातम्या –