बुलडाण्यात थंडीचा जोर वाढला

गेल्या आठवड्यात तापमानातील चढउतार झाल्यानंतर बुलडाणा शहर परिसरात थंडीचा जोर आता वाढला असून,सकाळी साडेआठ वाजता बुलडाणा शहराचे तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. किमान तापमानाच्या तुलनेत आणखी  तीन अंश सेल्सिअसने घटले आहे. गेल्या १५ दिवसापासून हवामानातील अनाकलीनय बदल आणि तापमान कक्षेत विषम स्वरुपाच्या झालेल्या बदलानंतर आता राज्यात थंडीचा जोर वाढत आहे.

कर्जमाफीचा राज्यातल्या ३० लाख शेतकऱ्यांना फायदा

राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच बुलडाण्यातही थंडीने जोर धरला आहे. वाढती थंडी ही कोल्ड क्राफ्टसाठी उपयुक्त आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बुलडाणा शहराचे गेल्या तीन वर्षातील निच्चांकी असे ७.८ तापमान २९ डिसेंबर २०१८ रोजी नोंदविल्या गेले होते. त्यानंतरचे हे आताचे ९.५ अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर

डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाने जिल्ह्यात दोनदा हजेरी लावली आहे. त्यामुळे जमीनीमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणावर ओल आहे. रब्बी हंगामासाठी ही ओल उपयुक्त असली तरी त्यामुळे थंडीचा जोर जिल्ह्यात येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान खात्यानेही राज्यात किमान तापमानात घट होण्याचे संकेत दोन दिवसापूर्वी दिले होते. त्याचा प्रयत्य आता येत आहे. गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण ही दिसून आले आहे. पहाटे धुक्याचे प्रमाणही बुलडाणा शहर परिसर व तालुक्याच्या भागात दिसून येत आहे.