मुंबई – राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा कडाका (Cold snap) जास्त आहे. मुंबईत सहसा थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.राज्यात या महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे, हवामान (Weather) विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ७,८,९ जानेवारीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली आहे, त्यामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पुढील २ ते ३ दिवस राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील मुंबई भागात 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील नाशिक, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. तर धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. मुंबईसोबतच राज्यातील अनेक भागात पश्चिमी चक्रवातामुळे पुढील तीन ते चार दिवस तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येणार्या पुढच्या पाच दिवसात उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांशी भागामध्ये किमान तापमानात तीन ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता आहे तर 26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- खुशखबर! आता मजुरांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन, कसा करावा अर्ज जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….
- शाळेची घंटा वाजणार! राज्यातील ‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू
- राज्यात 3 ते 4 दिवस थंडीचा कडाका वाढणार; मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता
- कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या केल्या रद्द
- कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे – छगन भुजबळ