राज्यात थंडीची हुडहुडी; महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ

थंडीचा कडाका

मुंबई – भारतात पुढील काही दिवस थंडी (Cold) मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे, राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचा जोर  सुरू असताना दुसरीकडे थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रात हवामानात (Weather)  मोठा बदल होणार असून थंडी चांगलीच वाढणार आहे, महाराष्ट्रातील  अनेक भागात थंडी वाढणार आहे,  मागील काही दिवसांमध्ये तापमनात घट होत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील  अनेक भागात थंडी जाणवू लागली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात अनेक  भागांमध्ये किमान तापमानाचा पारा घसरला. तरराज्यातील महाबळेश्वर भागात आज पहाटे तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअसजवळ जावून पोहोचला होता.

हवामान (Weather)  विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाडा, विदर्भात पावसासह गारपीटीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तविली आहे. राज्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात आज अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –