मुंबई – हवामान विभागाचा अंदाज राज्यात थंडीचा (Cold) कडाका वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील मुंबई भागात आज १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील नाशिक, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. तर धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. मुंबईसोबतच राज्यातील अनेक भागात पश्चिमी चक्रवातामुळे तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये पुढील काही दिवस थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर राज्यातील पुणे जिल्ह्यात किमान तापमान २६ तर कमाल तापमान १२ अंश आहे. नागपूरमध्ये किमान तापमान २५ तर कमाल तापमान ९ डिग्री राहील अशी शक्यता आहे. नाशिकमध्ये २४ डिग्री कमाल तर ६ डिग्री किमान तापमान राहील. औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहील.
त नागपूर वेधशाळेनं विदर्भातल्या बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ कायम ठेवलाय.
महत्वाच्या बातम्या –
- Budget २०२२: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा
- थंडीची हुडहुडी; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस थंडी वाढणार
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. २७ जानेवारी २०२२
- मोठी बातमी – राज्यात आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
- चांगली बातमी – देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इत