माहाराष्ट्रात थंडीची लाट; दवाखान्यात वाढली प्रचंड गर्दी!

थंडीचा कडाका

मुंबई – सध्या महाराष्ट्रात थंडीचा (Cold) कडाका जाणवत आहे . उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्र्रात गारवा पसरल्याचे चित्र बघायला मिळताना दिसते . महाबळेश्वर मधील नंदनवन ह्या ठिकाणी पारा हा शुन्य अंश घसरल्यामुळे येणारे पर्यटक हे गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे. परंतु थंडी आल्यामुळं आजरी पडण्याचे प्रमाण सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढले आहे .त्यामुळे आता दवाखाने झाले होउसफुल .. म्हणायची वेळ आली आहे.

थंडी(Cold), वातावरण,बदल ह्यामुळे आढळत आहे हे विकार…

वाढत चालली थंडी आणि वयोवृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल होतानाचे चित्र दिसत आहे .थंडी मुळे वृद्ध लोकांचे हात आखडणे तसेच बधिरता व अंगात कापरे भरणे हे प्रकार होत आहेत. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्दी,खोकला,डोके,घास,कान दुखी हे विकार आढळताना दिसत आहे.
रात्री वाजत असणारी थंडी दिवसभर जाणवत आहे नागरिक दिवसभर घराबाहेरील अंगणात उन्हात बसतानाचे चित्र ग्रामीण भागात आहे.

वाढत्या थंडीमुळे आहारात हा करा समावेश…

कडाक्याच्या ह्या थंडीत आपले शरीर गरम ठेवणे गरजेचे आहे तरी तुम्हाला वाटत असेल ह्या थंडीतआपण व आपले कुटुंब आजारी पडू नयेत तर उष्ण गुणधमर असलेले पदार्थांचा समावेश करावा
गवतीचाहा,आले,तुळस ह्यांपासून बनवलेला नैसर्गिक चहा,मध घ्यावे मधामध्ये शरीराला भरपूर ऊर्जा देण्यास मदत करते व आपली रोग प्रतिकारक शक्ती हि वाढवते घासत खवखव दूर करण्यास मदत करते आणि शरीराला आतून उष्ण ठेवते मध घातलेला काढा प्रश्न करावा हा थंडीच्या दिवसात लाभदायक ठरतो ,तसेच ह्या थंडीत साजुक तुपाचे सेवन करावे अत्यंत लाभदायक ठरते कारण तुपामध्ये फॅटी असिड असते हिवाळ्यात तुपामध्ये केलेले लाडू,हलवा,शिरा,उपमा असे पदार्थ खाणे लाभदायक ठरते.साजूक तुप त्वरित ऊर्जा निमार्ण करते शरीराची झीज भरून काढते .

म्हणूनच वाढत असलेल्या थंडीमुळे स्वेटर, कानटोपी, यांसारख्या उबदार कपड्यांचा वापर करावा आणि सर्वानी आपले आरोग्य सांभाळावे.

महत्वाच्या बातम्या –