विदर्भात थंडीची लाट

विदर्भात थंडीची लाट आली असून राज्यातील अनेक भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी सकाळी धुके पडत आहे. पुढील काही दिवस थंडी  विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहणार आहे.  उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातही थंडी वाढली आहे. विदर्भाच्या दिशेने अधिक प्रवाह असल्यामुळे विदर्भातील काही ठिकाणी थंडीची लाट आली होती.

हापूस आंबा यंदा एकाच वेळी बाजारपेठेत

आजही विदर्भात थंडीची लाट राहणार आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरणार आहे. काही भागात दिवसभर गारवा असला तरी उन्हाच्या झळा हव्याहव्याशा वाटत आहेत. सायंकाळी सहा वाजेनंतर पुन्हा थंडी वाढत जाऊन मध्यरात्रीनंतर चांगलीच थंडी वाढत आहे. पहाटे थंडीच्या तीव्रतेत वाढ होत आहे.

जाणून घ्या टोळ मासा खाण्याचे फायदे….

उत्तर भारतातील दिल्ली, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान या भागात थंडीची लाट आली असून या भागात रात्रीसह थंड दिवस जाणवत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी आहे. पूर्व मध्य प्रदेशातील बेतूल येथे सर्वात कमी १.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.