थंडीचा कडाका वाढणार : पुढील 24 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येणार

थंडीचा कडाका

मुंबई –  हवामान (Weather) विभागाचा अंदाजानुसार राज्यात थंडीचा कडाका (Cold snap) वाढणार आहे  आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील  आज मुंबईत कमाल तापमान 33 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.. तर राज्यातील नाशिक, नागपूर , पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये  25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे.  पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात काही आठवड्यांपासून खूप थंडी वाढली (very cold) आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा (Temperature mercury) घसरल्याने बऱ्याच भागात आपल्याला शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. राज्यात बऱ्याच जिल्ह्याचे तापमान(Temperature ) १० अंशांच्या खाली गेलं होतं. पण आता एवढ्या थंडीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसरळणार आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पावसासह rain गारपीटचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात राज्यातील  धूळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी , नांदेड, हिंगोली,औरंगाबाद या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वार्तिवला आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –