नागपूर – रक्ताची मागणी सध्या जास्त प्रमाणात आहे. पण त्या मागणी नुसार रक्ताचा पुरवठा हा खूप कमी असून त्याकरिता जनतेने सामाजिक कार्य म्हणून रक्तदान करण्याकरिता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटल येथे केले.
मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटल तसेच नाशिकराव तिरपुडे ब्लडबँक यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच बीपी, ईसीजी, ब्लड शुगर, बीएमडी, बीएमआय, जनरल चेकअप, तसेच कोव्हिड वॅक्सिन विशेष मोहीम राबविण्यात आली. रक्तदात्यांना नाशिकराव तिरपुडे ब्लडबँक कडून वाफारा मशीन, तसेच मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटल तर्फे नि:शुल्क औषधी वाटप करण्यात आला.
यावेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉ.प्रणय लांजेवार, डॉ. मनीष गनवानी, स्त्रीराग तज्ज्ञ डॉ. साक्षी बंसल (नंदा), रेडियोलॉजिस्ट डॉ. जितेंद्र विधानी, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.चित्तानंद मेंढे, जनरल सर्जन डॉ.आदर्श लालवानी, युरोलॉजी तज्ज्ञ डॉ. शब्बीर राजा, सिकलसेल असोसिएशन डॉ.ए.वी. श्रीखंडे तसेच नाशिकराव त्रिपुडे ब्लडबँक व मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर तसेच नर्स यांचा सहभाग होता.
यावेळी पालकमंत्री महोदयांनी रक्तदानाचे महत्व विशद करून कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत होता. त्यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबविण्यात आल्या होत्या. नागरिकांनी रक्तदान करणे ही एक सवय म्हणून आत्मसात करणे गरजेचे आहे. कारण आरोग्यासाठी कोणाला कधीही याची गरज भासू शकते. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक पुढाकार सामाजिक सवय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयोजकांनी एक स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी त्यांची कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ भागात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार शक्यता
- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता होणार मोठा फायदा; जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस
- कृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री
- झेंडू लागवड कशी करावी? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….