दिलासा: जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

कोरोना

उस्मानाबाद – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे, मात्र अशातच आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरी कडे म्युकरमायकोसिस, यात होरपळून निघतोय सामान्य माणूस. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

कोरोनाने हाहाकार माजवलेल्या जिल्ह्याला बुधवारी मोठा दिलासा मिळाला. ४ एप्रिलनंतर सर्वात कमी ३०६ एवढे नवीन रुग्ण बुधवारी आढळले. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरत असल्याचे अधोरेखित झाले आहे. दरम्यान, बुधवारी पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली तर ३४४ जणांना डिस्चार्ज मिळाला. आता जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत आहे असे चित्र सध्या तयार झाले आहे.

जिल्ह्यात मार्चपासून कोरेाना रुग्णवाढीचा क्रम वाढत होता. कोरोनाच्या विळख्यात उस्मानाबाद जिल्हा असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून बघत होतो मात्र आता उतरण सुरू झाली आहे. बुधवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३०६ नवे रुग्ण आढळले. दि. ४ एप्रिलला जिल्ह्यात २९२ रुग्ण आढळले होते. त्यानंतर दररोजचा आकडा ४०० पर्यंत होता. रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –