दिलासादायक : राज्यात सुमारे सव्वा लाख कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

राजेश टोपे

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

संकट समयी राजकारण करू नका, लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका – धनंजय मुंडे

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३८ हजार ७६२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.

फळबागांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देणार – अजित पवार

राज्यात नोंद झालेले १९८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-२८, नवी मुंबई मनपा-८, पालघर-३, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक मनपा-५, अहमदनगर-१, जळगाव-८, जळगाव मनपा-२, पुणे-४, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-५,सोलापूर मनपा-८, सातारा-८, कोल्हापूर-३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-५,जालना-३, बीड-१, नांदेड-२, अकोला मनपा-२, यवतमाळ-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

महत्वाच्या बातम्या –

अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत – अनिल देशमुख

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निरीक्षणाखालील सर्व ३७ प्रवासी निगेटिव्ह – आरोग्यमंत्री