दिलासादायक : गेल्या २४ तासात राज्यात तब्बल ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये काल 44493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29644 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत एकूण 5070801 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.74% एवढे झाले आहे.

राज्यात काल 555 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32441776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5527092 (17.4 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2794457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल  एकूण 367121 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

परंतु आता महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या विल्क्यातून बाहेर पडत असतानाच म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईमध्ये या आजाराचे तब्बल 29 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता अधिक सतर्क राहणे सध्या तरी गरजेचे बनलेले आहे.

महत्वाच्या बातम्या –