कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषिमंत्री

कृषिमंत्री दादाजी भुसे

भंडारा – 1 जुलै माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन साजरा करण्यात येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 1 ते 7 जुलै 2020 हा सप्ताह कृषी संजीवनी सप्ताह म्हणून  संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. कृषी विद्यापिठाचे कुलगुरु व विद्यार्थी यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १२ कोटी ४४ लाख रुपयांची रक्कमपवनी तालुक्यातील निलज येथे शिवार फेरी व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी कृषिमंत्र्यांनी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी व्ही. जे. पाडवी, प्रगतशील शेतकरी संजय एकापूरे प्रामुख्याने उपस्थित होते.

औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विक्री करू नये – अन्न व औषध विभाग

निलज येथील प्रगतशील शेतकरी नरेंद्र ढोक यांनी प्रतिकूल परिस्थितीत कारल्याची शेती करून आदर्श निर्माण केला. याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेती करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे तरच कृषी दिनाचा उद्देश सफल होईल, असे कृषिमंत्री यांनी सांगितले.

कोरोना हॉटस्पॉट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू ॲपचा प्रभावी वापर आवश्यक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, गोसेचे पाणी व वीज शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे. अनेक  कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात याबाबत  शेतकऱ्यांशी संवाद साधला. याबाबत जाणीवपूर्वक लक्ष घालून शासन दरबारी प्रयत्न करण्यात येईल, असे ते म्हणाले.. शेतकऱ्यास खताचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या – 

आयसीआयसीआय व्हेंच्युअरचे कर्मचारी आणि कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपये

पालकमंत्र्यांच्या हस्ते फळबाग लागवडीचा शुभारंभ; शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे वाटप